अहेरी : आपण ज्या समाजात राहातो त्या समाजाप्रती आपल्या जबाबदारीचे भान ठेवत आलापल्ली – नागेपल्ली येथील पद्मशाली समाजाचे सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्षाबंधन निमित्य मंदिरात अखंड ज्योत पुजेचे औचित्य साधून बुधवार दिनांक 30/8/2023 रोजी श्री मार्कंडेश्वर मंदीर परिसरातील मोकळ्या जागेत झाडांचे वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला.31/8/2023 ला समाजातील समाजबांधवानी रक्तदान शिबीर आयोजीत करुन यात समाजातील बंधु भगीनींनी खुप छान सहभाग देऊन सहकार्य केले.श्री मार्कंडेय मंदिर येथे गुरुवारी सांयकाळी 4:30 ते सांयकाळी 6:30 यावेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात सहभागी होऊन या उपक्रमाला समाजातील जेष्टांनी शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर वृक्षतोडीमुळे ढासळत चाललेला पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षारोपणात प्रत्येकाने सहभाग घेतला.या रक्तदान शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालय अहेरी येथील रक्तपेढीने सहकार्य केले.रक्तदान शिबीर नंतर समाजातील सिव्हील कांट्रैक्टर श्री व्येंकटेश इग्गावार यांनी महाप्रसादचा संपुर्ण खर्च दिला व महाप्रसाद वितरणच्या कार्यात प्रत्यक्ष सहकार्य करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Home अहेरी रक्षाबंधन निमित्य पद्मशाली समाज आलापल्ली नागेपल्ली सामाजीक बांधीलकी जोपासत राबवला वृक्षारोपण आणि...