अहेरी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष श्री.महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांच्या वाढदिवस निमित्त अहेरी विधानसभा क्षेत्रातील अजयभाऊ कंकडालवार व मडावी साहेबांचा प्रमुख उपस्थित विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झालं आहे.
ब्राम्हणवाडे यांच्या वाढदिवस निमित्त काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती माजी सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालय येथील तालुक्यातील छालेवाडासह इतर गावातील नागरिकांना कंकडालवार कडून ताडीपत्री वाटप करण्यात आली.तसेच काही नागरिकांना आर्थिक मदत पण करण्यात आली आहे.
यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हणमंतू मडावी,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,चंदू बेज्जलवार,अज्जू पठाण,स्वप्नीलभाऊ मडावी,विलास बोरकर,गुलाब देवगडे,प्रभाकर दुर्गे,राजाराम दुर्गे,प्रभाकर जुमडे,भगवान झाडे,मोहन झाडेसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी ब्राम्हणवाडे यांच्या वाढदिवस निमित्त कंकडालवार यांच्या कडून अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध कार्यक्रम