अहेरी : तालुक्यातील कुरूपल्ली येथील नं.वन सि.सि.कुरूमपल्ली ( एकरा ) व्हाॅलीबाॅल मंडळ द्वारे भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल सामन्याचे आयोजित केले आहे.या आयोजित व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन काँग्रेसचे नेते व अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्करभाऊ तलांडे यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
सदर व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कांकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात आली.द्वितीय पारितोषिक आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून तसेच तृतीय पारितोषिक ग्रामपंचायत पेसा कोस समिती अध्यक्ष एकरा विजय तलांडे कडून देण्यात आली.
कार्यक्रमाचे सहउदघाटक म्हणून ग्रामपंचायत पेसा कोस समिती अध्यक्ष एकरा विजय तलांडे,अध्यक्ष म्हणून सरपंच मैनी तलंडी हे होते.यावेळी मुत्ता पोरतेट,रमेश पोरतेट,सूर्यकांत,आत्राम सैलेश कोंडगुर्ल,कैलशा झाडे,विजू अत्राम बळवंत आत्रामसह आदी उपस्थित होते.