अहेरी : वेलगुर वनपरिक्षेत्रात अनेक वर्षांपासून जमीन कसत असलेल्या शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळाले असल्याची पटवारी व संबधीत अधिकारी याना याची माहिती देऊन सुद्धा पट्टे धारक शेतकरी यांच्या मय्यती नंतर सुद्धा वनहक्क पट्यावर वारसांनाची नावे चढवत नव्हते म्हणून वेलगुर वनपरिक्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्यांच्यावर होत असलेला अन्याय.
काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात येऊन आपली आपतबिती सांगितले तर लगेच अजय कंकडालवार यांनी लगेच तहसील कार्यालय गाठून शेतकऱ्यांवर होत असलेला हा अन्याय तहसीलदार यांना सांगितले
वेलगुर परिक्षेत्रातील शेतकऱ्यांसमोर समोर संबधीत तलाठी यांना बोलावून विचारणा करण्यात यावी तसेच वणपट्टे मिळालेल्या शेतकऱ्यांचे वारसांन चढवण्यात यावे अशी मागणी निवेदन देऊन या विषयावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अशी निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
यावेळी निवेदन देतांना अशोक येलमुले,सुरेश येरम,मधुकर येरम,नामदेव मडावी,किसन सडमेक,जगनाथ कुळमेथे,देवाजी सडमेक,संतोष सडमेक,महादेव कुळमेथे,अमसा कुळमेथे,मलेश सडमेक,मोतीराम सडमेक,गणपत सडमेक,श्रीकांत कुळमेथे,मुकेश कुळमेथे,निलेश करपेत,टरिभाऊ आलम,राकेश टेकाम,भगवान बोर्यम,सुनीता करपेत,कमला आत्राम,शकुंतला बोर्यम,सुमिगा टेकामसह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.