Home मुख्य बातम्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला मोठा झटका : सिंद्धा टोला येथील अनेक...

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला मोठा झटका : सिंद्धा टोला येथील अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

23
0

अहेरी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सिंद्धा टोला येथील भारतीय जनता पक्षाचे दिग्गज पदाधिकारी प्रसाद बाबुराव वेलदी यांनी भाजपाला रामराम करून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

पक्षातील अंतर्गत नाराजी व कार्यपद्धतीतील असमाधानामुळे प्रसाद वेलदी यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात धरला. सदर पक्षप्रवेश सोहळा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. अजयभाऊ कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालय, अहेरी येथे पार पडला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव अजय कंकडालवार व सचिव हनमंतू मडावी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. या प्रसंगी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी प्रसाद वेलदी यांचे पक्षाचे दुपट्टे टाकून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,सुंदर नैताम,सत्यम नीलम,समय्या मुलकरी,आनंद जियाला,विष्णू मुलकरी,आनंद मुलकरी,सीताराम वेलदी,जयराम आत्राम,विनोद दुनलावर,सागर वेलदी, राजू मडावी,जे. टी.मडावी,परदेश मडावी,अनिल मुलकरी,बापू शेगम,संतोष मडावी,मासा मडावी, कारे वेलदी,मारा वेलदी,रमेश मडावी यांच्यासह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here