Home अहेरी उमानूरमध्ये धान उघड्यावर; गुरांच्या तोंडी शेतकऱ्यांचा घाम…डॉ.अजयभाऊ कंकडालवारांची तातडीची पाहणी; अधिकाऱ्यांना त्वरित...

उमानूरमध्ये धान उघड्यावर; गुरांच्या तोंडी शेतकऱ्यांचा घाम…डॉ.अजयभाऊ कंकडालवारांची तातडीची पाहणी; अधिकाऱ्यांना त्वरित उचल करण्याचे निर्देश

1
0

अहेरी : तालुक्यातील उमानूर येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्यादित अंतर्गत असलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात धान खरेदी करण्यात आले होते.मात्र अद्यापही त्या धानाची उचल न झाल्याने संपूर्ण धान उघड्यावर पडून आहे.

परिणामी हे धान खराब होण्याच्या मार्गावर असून गावातील गुरेढोरे ते खात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले धान अशा प्रकारे वाया जात असल्यामुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या घामाचे मोल मातीमोल होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.दरम्यान या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी उमानूर येथे प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

त्यांनी स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतली.यावेळी त्यांनी टी.डी.सी.चे अधिकारी राजूरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत तातडीने धान उचल करण्याचे व खरेदी प्रक्रिया सुरळीत करण्याचे निर्देश दिले.

या पाहणी दौऱ्यात अजय नैताम माजी जि.प. सदस्य, भास्कर तलांडे माजी सभापती, अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,लक्ष्मीस्वामी अट्टेला,शंकरीताई पोरंतेट सरपंच,गोविंदगाव,शामराव गावडे,बापू गांदार्ला यांच्यासह शेतकरी बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक शेतकऱ्यांनी त्वरित धान उचल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here