Home मुख्य बातम्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने लवकर निकाली काढावे : अजय कंकडालवार

राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने लवकर निकाली काढावे : अजय कंकडालवार

74
0

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत नागेपाल्ली अंतर्गत येत असलेल्या पुसूकपाल्ली येथील आयुष्यमान भारत कार्यालय दहा बारा दिवसा पासून बंद असल्याने”या”नागरिकांना अडचण निर्माण होत आहे.लवकरत लवकर कर्मचाऱ्यांची मागणी निकाल काढावे म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी सरकारकडे मागणी करत आहे.

कायम सेवेत समायोजन करावे, या मुख्य मागणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेले सुमारे ३० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी २५ ऑक्टोबरपासून विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन पुकारले आहे.राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात दोन दिवस राज्यस्तरीय आंदोलन पुकारण्यात आले होते.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागात २००७ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत विविध प्रवर्गांत कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात आली आहे.अनेक कर्मचारी १० ते १५ वर्षांहून अधिक कालावधी पासून काम करत आहेत.कंत्राटी स्वरुपात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची परीक्षा,मुलाखत अशा विहित पद्धतीने निवड करण्यात आली आहे.

सध्या राज्यभरात ४० हजारांहून अधिक जागा रिक्त असून या रिक्तपदी एनएचएम अंतर्गत काम करत असलेल्या कर्मचार्‍यांचे समायोजन करावे,अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.
२००९ पासून कंत्राटी कर्मचारी संवैधानिक मार्गाने आपल्या विविध मागण्या मांडत आहेत. देशातील राजस्थान,मध्य प्रदेश,ओडीसा,गोवा,मणिपूर”या”राज्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांना समान वेतनश्रेणी,रजा अधिनियम,नियत निवृत्तीपर्यंत सेवा हमी अशा प्रकारच्या सुविधा लागू केल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या प्रश्नी लक्ष घालून कंत्राटी कर्मचार्‍यांना न्याय द्यावा.अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने लवकर निकाली काढावा अशी मागणी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी केली आहे.

“या”आंदोलनामुळे आरोग्य सेवा विस्कळित झाली आहे.प्रसृतीसाठी आलेल्या गर्भवतींना त्वरित सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत.गरिब,सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत.”या”सर्व समस्या शासनाने लक्षात घेऊन या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकर निकाली काढण्यात यावी म्हणून माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी राज्या सरकारकडे मागणी करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here