अहेरी : तालुक्यातील मांडरा येथील काँग्रेसचे कार्यकर्ते व अजयभाऊ कांकडालवार यांचे कट्टर समर्थक माणिकराव मडावी यांच्या वडील काही दिवसांअगोदर निधन झाले होते.काल आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी तालुक्यात दौऱ्यावर असतांना येथील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदर माहिती कंकडालवारांना सांगितल्याने अजय कंकडालवार व हणमंतु मडावी यांनी मांडरा येथील जाऊन मडावी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी मांडरा ग्रामपंचायतचे सरपंच विलास मडावी,आविस काँग्रेस कार्यकर्ते प्रमोद कोडापे,नरेंद्र गर्गम,स्वामी दुर्गे,महादेव मडावी,तशुभाई शेख,प्रमोद गोडशेलवारसह आदी उपस्थित होते.