सावली : आगामी विधानसभा जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी आपण अहेरी विधानसभा क्षेत्रासह गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्यासाठी भक्कमपणे परिश्रम घेणार असे प्रतिपादन काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केले.
लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान,खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा सत्कार सोहळा व विजयोत्सव सावली तालुका काँग्रेस कमिटी द्वारा तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे ६ जुलै रोजी साजरा करण्यात आला यावेळी कंकडालवार हे प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर बोलत होते.
दरम्यान महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षानेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार व नवनिवार्चित खासदार डॉ.नामदेव किरसान, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी येथील आगमन होताच कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात, फटक्यांची आतिषबाजी करत जंगी स्वागत करत लोकसभा निवडणुक विजयोत्सव रैली काढण्यात आली आहे.
यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार तसेच सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील व जिल्ह्यातील ना.विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार किरसान साहेबांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकित दिवस – रात्र परिश्रम घेऊन काँग्रेसचे उमेदवारांना जिंकून देण्यासाठी शेवटच्या वेळेपर्यंत लढवाणार असे प्रतिपादन कंकडालवार यांनी मंचवार बोलतांना केले. विशेष म्हणजे अजयभाऊ कंकडालवार यांचे नाव इतर जिल्ह्यातही ओळखीचे झाले आहे.यावेळी कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक हजारो संख्येने उपस्थित होते.
Home राजकीय येणाऱ्या विधानसभा जि.प-पं.स निवडणुकीसाठी भक्कमपणे परिश्रम घेऊन काँगेसचा उमदेवार निवडून आणणार