सिरोंचा : गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांची येत्या दहा व अकरा सप्टेंबरला सिरोंचा तालुका दौऱ्यावर येत असून त्यांचेसोबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे तसेच काँग्रेस पक्षाचे अहेरी विधासभा समन्वयक तथा माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी आदी उपस्थित राहणार आहे.
खासदार डॉ.किरसान सिरोंचा येथे 10 तारीखेला कार्यकर्त्यांकडून आयोजित सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.त्यानंतर विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहे.आढावा बैठकीनंतर खासदार असारेल्ली – झिंगानूर – रेगुंठा परिसरातील नागरिकांची समस्या जाणून घेतील तसेच त्या भागातील कार्यकर्त्यांची संवाद साधतील.विशेष म्हणजे खासदार डॉ.किरसान हे 9 सप्टेंबरला सिरोंचा येथे मुक्काम करून सकाळी 10 तारीखेला विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे.
सिरोंचा तालुक्यातील महाविकास आघाडी,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच आजी – माजी सरपंच,उपसरपंच – नगरसेवक – नगराध्यक्षा – आजी – माजी जि.प.सदस्य सह तालुक्यातील आणि शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका काँग्रेस कमिटी कडून करण्यात आली आहे.