भामरागड : तालुक्यातील कोठी,घोटपाडी,आरेवाडा,तडगाव,येथील उप प्रादेशिक अहेरी ( उच्च श्रेणी ) आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मार्फत खरीप पणन हंगाम धान खरेदी केंद्राचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते फित कापून धान खरेदी सुरूवात करण्यात आले आहे.या धान खरेदी कार्यक्रमला महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ नाशिक संचालक संचालक मा.श्री.सैनजी गोटा यांनी प्रमुख उपस्थित होते.
अधिकृत केंद्रावराच धान विक्री करा ज्या शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाला आहे.त्यांनी आपल्या धान विक्री करावे आणि ज्यांच्या ऑनलाइन नोंदणी झाले नाही.त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि कोणीही शेतकरी यापासून वंचित राहू नये आणि शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार व महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ नाशिक संचालक मा.श्री.सैनूजी गोटा यांनी केले.कोठी,घाटपाडी,अरेवाडा,कोठी,तडगाव येथे धान खरेदीला सुरु झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी भामरागड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगमी,नगरउपाध्यक्ष विष्णू मडावी,तालुका उपाध्यक्ष प्रभाकर मडावी,राजू वड्डे माजी नगराध्यक्षा,निकिता पुंगाटी(P.A)दानू आत्राम,चिन्नू सडमेक,महेश वरसे,बिरजू तेलामी,किशोर कडंगा सरपंच ग्रामपंचायत होद्री,नंदू महाका सरपंच ग्रामपंचायत नेलगुंडा,प्रसाद कुड्यामी,प्रवीण मोगरकर,आकाश मोगरकर,कन्ना हेडो पाटील कोठी,लालसु हेडो सोसायटी अध्यक्ष कोठी,चरणदस मडावी,जयराम मडावी यांच्या सह परिसरातील शेतकरी बांधव व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व संचालक सैनूजी गोटा यांच्या हस्ते कोठी,घोटपाडी,आरेवाडा,तडगाव येथील...





