मुलचेरा : तालुक्यांतील सुंदरनगर येथील नेताजी क्लब सुंदरनगर द्वारा आयोजीत ग्रामीण रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजय भाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी होते.कार्यक्रमाचा विशेष अतिथी म्हणून माजी जि.प.सदस्य रविभाऊ शहा,ग्रामपंचायत सदस्य बंटीभाऊ शेंडे, सामाजिक कार्यकर्ते कमलेश सरकार होते.
भव्य ग्रामीण रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून देण्यात आली.
यावेळी मंचावर आल्लापली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार सामाजिक कार्यकर्ते नरेश गर्गम,दास काका,नितेश मलिक,बिरज पाल,जमाई(प्रशांत),सुकमार साना,राहुल दास,हितेश हलदर,कुणाल सरकार दिपचांद दत्ता, अनिमेश,कलाचंद डे,समीरसह परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच क्रीडा प्रेमी,गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्र समन्वयक अजय कंकडालवार यांच्या हस्ते रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे...