अहेरी : तालुक्यातील मोतूकपल्ली येथील जय पेरसापेन सी.सी.मोतूकपल्ली यांच्या वतीने भव्य ग्रामीण खुले व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित केले आहे.या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांचा कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तसेच द्वितीय पारितोषिक एम.के.तिम्मा क्षेत्रसहाय्यक मरपल्ली,पोलीस मदतकेंद्र कडून तृतीय पारितोषिक सुभाष पारचके,मोतूकपल्ली ग्रामपंचायतचे सदस्य श्रीनिवास कोडापे कडून देण्यात येत आहे.सदर स्पर्धेची उदघाटन माजी जि.प.सदस्य अजय नैताम यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी रेगुलवही ग्रामपंचायतचे माजी सरपंच लिंग्गा वेलदी,रेगुलवही ग्रामपंचायतचे सदस्य श्रीनिवास कोडापे,माजी उपसरपंच गणपती नैताम,भगवान गावडे,सिद्दू कुळमेथे,बिच्चू पेंदाम,वेंकटी सिडाम,येरा कोरेत,भीमराव पोरेट,रंगा मडावीसह आदी उपस्थित होते.