अहेरी : 9 ऑगस्ट रोजी जागतीक आदिवासी दिवस म्हणून साजरा करतात.या दिवसी सर्व जण आदिवासी बांधव एकत्र येतात आणि आपल्या आपल्या संस्कृती प्रमाणे वेशभूषा घालतात.गाणे आणि नृत्य करून हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात.
काल अहेरी विधानसभा क्षेत्रातील स्थानिक अहेरी आगारात आणि आलापल्ली,तलवाडासह विविध ठिकाणी आदिवासी दिन मोठ्या उत्सहात पार पाडले आहे.आयोजित आदिवासी दिना कार्यक्रमात काँग्रेसनेते माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी प्रामुख्याने उपस्थित होते.
अहेरी आगारात व आलापल्ली आणि तलवाडा येथील साजरा केलेल्या आदिवासी दिन कार्यक्रमाता काँग्रेसनेते कंकडालवार व आदिवासी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मडावी यांनी भाषणात म्हंटले की,डॉक्टर बाबासाहेबांनी एक मूल मंत्र सांगीतले आहे की शिका संघटीतव्हा संघर्ष करा.प्रत्येक क्षेत्रात आदिवासी बांधव पुढे गेला पाहिजे त्या अनुषंगाने सातत्याने प्रयत्न केले पाहिजे.
मात्र काही लोकं आपल्या आदिवासी समाजमध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यामुळे आदिवासी बांधवांनी वज्रमुठ बांधण्याची गरज आहे.राजकारणात समाजातील नागरीक कोणत्याही पक्षात असतात पण राजकारणात आपण कितीही विरोधक असलो तरी समाजासाठी मात्र एकत्र येणे ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे समाजाच्या कार्यक्रमात राजकारण न करता समाजहिताचे काम करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा.असे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेससेल जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी प्रतिपादन केले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच,स्वप्नील मडावी,नरेंद्र गर्गम,सचिन पांचार्या,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक कार्यकर्ते तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.