Home अहेरी आदिवासी समाजाच्या हिताचे रक्षणसाठी आपण सदैव कटिबद्ध ;कंकडालवार : मोकेला येथे आदिवासी...

आदिवासी समाजाच्या हिताचे रक्षणसाठी आपण सदैव कटिबद्ध ;कंकडालवार : मोकेला येथे आदिवासी दीन  मोठ्या उत्सहात साजरा

43
0

भामरागड : ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन हा आदिवासींच्या हक्कांचा आणि पृथ्वीवरील जीवनमान सुधारण्यात त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी साजरा केला जातो.

या दिवसाचे महत्त्व जगभरातील आदिवासींना भेडसावणाऱ्या आव्हानांना ओळखण्यात आहे.जसे की वंशवाद,गरिबी आणि आरोग्यसेवा आणि शिक्षणाची मर्यादित उपलब्धता.हा दिवस आदिवासी लोकांच्या विविध सांस्कृतिक वारसा,चालीरीती,भाषा आणि दृष्टिकोनांचे जतन आणि सन्मान करण्याची आठवण करून देतो,

ज्याचा उद्देश सार्वजनिक जागरूकता वाढवणे आणि आदिवासी गटांमध्ये एकता वाढवणे आहे.आदिवासी संस्कृतींचा आदर करणे आणि समजून घेणे सहानुभूती आणि आत्म-मूल्य वाढवते.

भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम येथील आज आदिवासी दिन निमित्त गोंडवाना गोटूल भूमी मोकेला येथे आदिवासी दिन कार्यक्रम मोठ्या उत्सहात संपन्न झालं आहे.तसेच त्या ठिकाणी गोंडवाना सप्तरंगी ध्वज स्थापना करण्यात आली आहे.

कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित दर्शवून कार्यक्रमाला मार्गदर्शन केले आहे.

त्यावेळी कंकडालवारांनी समस्त जनतेला आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन यांच्याहस्ते बिरसा मुंडा,वीर बाबूराव शेडमाके या महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी गावडे साहेब,किलनाके मॅडम,प्रमेशदादा उपसरपंच,प्रभाकर दादा,चिन्नु दादा,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,प्रवीण कोरेत,पिंटू मडावी,राकेश सडमेकसह गावातील समस्त आदिवासी बांधव तसेच स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here