Home सिरोंचा जाफ्राबाद येथील पाण्याची समस्या दूर : काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांनी स्वखर्चाने खोदून...

जाफ्राबाद येथील पाण्याची समस्या दूर : काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांनी स्वखर्चाने खोदून दिल्या तीन बोअरवेल

15
0

सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायत जाफ्राबाद वार्ड नंबर दोन येथील नागरिकांना पाण्याची टंचाई भेडसावत होती.ही समस्या तेथील नागरिकांनी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या कानावर घातली.ही समस्या अवगत होताच त्यांनी स्वखर्चाने तीन बोअरवेल खोदून देऊन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडविली.

या बोअरवेलचे उदघाटन स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हस्ते पार पडला.सिरोंचा,जाफ्राबाद दौरा दरम्यान काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांनी जाफ्राबाद येथील दौऱ्यावर असतांना वार्ड नंबर दोन येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने वार्डातील नागरिकाना अडचणींना तोंड द्यावे लागत होते.

येथील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकानी कंकडालवारांच्या कडे समस्या मांडली होती.त्यावेळी त्यांनी लवकरात लवकर आपल्या गावातील पाण्याची समस्यासह आदी समस्यांची सोडवण्यात येणार असे आश्वासन दिले.त्या आश्वासनाची पूर्ती त्यांनी केली.यावेळी नागरिकांनी अजय कंकडालवार यांचे आभार व्यक्त केले.

या बोअरवेलच्या उदघाटन प्रसंगी जाफ्राबाद ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम,ग्रामपंचायत सदस्य महेंद्र दुर्गम,मदन कोंडागुर्ला,नारायण दुर्गम,राकेश जाडी,ओलाय्या करसपाल्ली,समय्या, कोंडागुर्ला,संतोष करसपाल्लीसह गावातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here