अहेरी : ८ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टी निर्माण झाली आहे.याचा सर्वात जास्त फटका अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा,भामरागड,मुलचेरा,एटापल्ली,अहेरी तालुक्याला बसला असून येथील पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुसळधार पाऊस अतिवृष्टीमुळे अहेरी तालुक्यातील रापेल्ली येथील रैनु दस्सा आत्राम यांच्या घराची अतोनात नुकसान झाल्याने आत्राम कुटुंब उघड्यावर आले आहे.रैनु दस्सा आत्राम यांनी आज काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालय येथे कंकडालवार यांची भेट घेऊन परिस्थिती सांगितले.
अजयभाऊ कंकडालवार यांनी आत्राम परिवाराची अडचण लक्षात घेऊन तात्काळ आत्राम परिवाराला घर दुरुस्तीसाठी आणि जीवनावश्यक वस्तूसाठी आर्थिक मदत केले.अतिवष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शासन व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसानीचे मोका पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह बेघर झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी काँग्रेसचेनेते व माजी जि.प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,पेरमिली ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य प्रमोद आत्राम,नरेंद्र गर्गम, कार्तिक तोगम,मोतीराम तलांडी,प्रकाश दुर्गे,कवीश्वर चंदनखेडे,प्रमोद गोडशेलवार,अनील इस्कापेसह आदी उपस्थित होते
Home अहेरी अतिवृष्टीमुळे आत्राम कुटुंब उघड्यावर : काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा समन्वयक अजयभाऊ कंकडालवार...