एटापल्ली : शहरी भागात विविध सामाजिक संस्था व क्रिडा मंडळांकडून नाट्यरसिकांचे मनोरंजनासाठी तसेच समाज प्रबोधन व समाज जागृतीसाठी भिन्न भिन्न नाट्यप्रयोगाचे आयोजन करीत असतात.याच धर्तीवर एटापल्ली तालुक्यातील जिवनगट्टा येथे नवयुवक नाट्य कला मंडळ,जिवनगट्टा यांच्या सौजन्याने संगीत नाटक ( नवसाचं पोर ) नावाचं नाट्यप्रयोगाचे बंद शामियानात आयोजन करण्यात आली.
या संगीत नाटकाचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व जि.प.माजी अध्यक्ष,अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आला.
संगीत नाटकाचे उदघाटक म्हणून उपस्थित नाट्यरसिकांना मार्गदर्शन करतांना अजयभाऊ कंकडालवार म्हणाले,नाटक म्हणजे जिवंत,मृत,पौराणिक,ऐतिहासि,काल्पनिक व्यक्ती यांच्या भूमिका करणाऱ्या नटानीं रंगमंचावर सादर केलेली संवादात्मक,अभिनयमय,नृत्यमय आणि काव्यात्मकता म्हणजेच नाटक असून नाटकाचे अनेक प्रकार असून यात संगीत नाटकाला आजही अनन्य महत्व आहे,नाटक आणि ग्रामीण समाजाचा विकास हे एक कला प्रकार म्हणून मानवी जीवनावर लक्ष केंद्रित करून प्रतिबिंब उमठवीत असतात,असे बहुमूल्य मार्गदर्शन त्यांनी केले.
संगीत नाटकाचे उदघाटन प्रसंगी पुढे बोलतांना कंकडालवार म्हणाले,नाटक हे एक जिवंत सांप्रदायिक कला असून त्यात संगीत नाटक हे मराठी रंगभूमीचे खास वैशिष्ट्य आहेत.रंगमंचावर सादर करणाऱ्या नाटकातुन प्रत्येक नाट्यकलावंत हे अनेक पात्रांतून कथाकथनाचे कार्य करीत असतात.
कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून जितेंद्रभाऊ टिकले,सह उदघाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनुमंतू मडावी,काँग्रेसनेते प्रज्वल नागूलवार,
एटापल्ली नगरपंचायतचे नगराध्यक्षा रेखाताई मोहुर्ले,रैनू हिचामी,देवाजी अरमा,फकरीजी हिचामी होते.
यावेळी परिसरातील नाट्य प्रेमी,प्रतिष्ठित नागरिक तसेच काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते,गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी संगीत नाटक हे मानवी जीवनावर लक्ष केंद्रित करून जीवनाचे प्रतिबिंब उमठवीत असतात…काँग्रेस...





