अहेरी : तालुक्यातील गोविंदगावं येथील आज आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील दौरा करून ग्रामीण भागातील नागरिकांची समस्या जाणून घेतले.
यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या,गली रस्ते,नाली आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.तसेच येथील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले असता.समस्यांची निराकरण करण्यात येईल असे अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील नागरिकांना सांगितले.
यावेळी अजय नैताम माजी जि.प.सदस्य,सुरेखा आलाम माजी पंचायत समिती सभापती,माजी सरपंच अशोक येलमुले वेलगुर,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,शंकरी ताई पोरर्तेट सरपंच गोविंदगाव,सामजिक कार्यकर्ते नरेंद्र गर्गम,उमाकांत राचेलावार, किस्टाय्या आलम, वेंकटी कावरे,चरण गोधारी,देवाजी गोदरी,मुकुंद कोंडागुरले,तिरुपती अल्लुरी,नानाजी कोंडागुरले,प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचार्यसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.