सिरोंचा : नुकतेच गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेराव किरसान साहेब व जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे तसेच काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,माजी आमदार पेंटारामा तलांडे,आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी साहेब यांनी सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.
या भेटीदरम्यान अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या.तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव आणि रिक्त पदांच्या समस्येमुळे रुग्णांना अडचणी येत आहेत.रुग्णालयात उत्तम सोयी सुविधा,आवश्यक उपकरणे आणि प्रशिक्षित कर्मचारी यांचा अभाव आहे.
सभोवतालच्या 100 गावांसाठी हे एकमेव ग्रामीण रुग्णालय असल्याने या समस्यांचा परिणाम मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांवर होत आहे.दरम्यान तालुकाध्यक्ष सतीशभाऊ जवाजी यांनी याबाबत खासदारांना निवेदन देऊन या समस्यांच्या दिशेने त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे.तात्काळ हा रुग्णालयचे समस्या धूर करण्यासाठी प्रयत्न करणार अशी खासदार साहेबांनी म्हणले.
यावेळी तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी सिरोंचा सतीश जवाजी,काँग्रेसनेते बानया जनगाम,अहमद अली,काँग्रेसनेते रवी सल्लम,बाजार समिती संचालक मलिकार्जून आकुला,काँग्रेस जेष्ठनेते मंदा शंकर,अजयभाऊ सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,वैद्यकीय अधिकारी डॉ.वाघमारे,अब्दुल सलाम,सारय्या सोनारी,युवा काँग्रेस कार्यकर्ते माजिद अलीसह तालुका परिसरातील महाविकास आघाडी,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.