Home अहेरी अखेर अहेरी येथील प्राणहिता कॅम्प ते शहारापर्यंतच्या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात

अखेर अहेरी येथील प्राणहिता कॅम्प ते शहारापर्यंतच्या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात

44
0

अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली अंतर्गत येणाऱ्या आलापल्ली रोड वरील अहेरी येथील प्राणहिता कॅम्प ते अहेरी शहारापर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन भरपुर कालावधी उलटला होता.परंतु सदर रस्त्याचे काम कासवगतीने सुरू होता.त्यामुळे या रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना फटका बसत होता.

तसेच या रस्त्याच्या कडेला गिट्टी टाकुन असल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली होती.आणि रस्त्याचे बांधकामही निकृष्ट दर्जाचे होत होता.म्हणून या रस्त्याची योग्य चौकशी करण्यात यावी व कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि अंदाजपत्रकानुसर काम करण्यात यावी,आठवडाभरात रस्त्याच्या कामाला जलदगतीने सुरुवात करण्यात यावी म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जिल्हा परिषद  अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी संबंधित विभागाला निवेदन देऊन निवेदनातून आंदोलनाची सुध्दा इशारा दिले होते.सदरहू निवेदनाची प्रत त्यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली,कार्यकारी अभियंता,अप्पर जिल्हाधिकारी यांना पाठविले होते.

                काँग्रेस नेते कांकडलवार यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी संबंधित कंत्राटदार व कंकडालवार यांची बैठक लावून संबंधित कंत्राटदाराला कामाला तत्काळ सुरू करण्याचे सूचना दिले होते.अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार अखेर कंत्राटदार यांनी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली असून रस्त्याचे काम जलदगतीने सुरू आहे.कासवगतीने सुरू असलेल्या रस्त्याचे कामाला जलदगती मिळवून दिल्याबद्दल स्थानिक जनतेनी कंकडालवार यांचेबद्दल समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here