अहेरी : मागील दोन तीन महिन्यांपूर्वी अहेरी ते वांगेपल्ली या रस्त्याची खडीकरण आणि डांबरीकरणाची काम करण्यात आली होती.परंतु पावसाळ्याच्या पहिल्याच पावसात या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्लीकडून या रस्त्याची योग्य देखभाल अभावी अत्यंत नित्कृष्ट दर्जाची काम झाले असून सदरहू रस्त्यावरील खड्डे बुजविले कि नव्याने डांबरीकरण करण्यात आले? असे संतप्त सवाल उपस्थित करून अतिनित्कृष्ट दर्जाचे काम करणारे संबंधित कंत्राटदारावर योग्य कारवाई करण्याची मागणी जि..प माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.
तसेच अहेरी ते महागाव, अहेरी ते देवलमरी आणि गैर्रा ते गुडेम कडे जाणाऱ्या या सर्व रस्त्यांची सुद्धा अत्यंत खालच्या दर्जाचे काम झाल्याने खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाली असून याची फटका या दररोज रस्त्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला बसत आहे.तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या या रस्त्यांचे बांधकामाची संबंधित कंत्राटदाराने संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना हाताशी धरून अतिनित्कृष्ट काम केले आहे.यामुळे सरकारची कोट्यवधी रुपयांची नुकसान झालेली आहे.
सदरहू रस्त्यांवरील निकृष्ठ दर्जाची कामांची अजयभाऊ कंकडालवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांनी समंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी द्वारे या सर्व रस्त्यांची नित्कृष्ट कामाची माहिती देत संबंधित कंत्राटदारावर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.वरील सर्व रस्त्यांची नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर जर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून योग्य कारवाई न झाल्यास आल्लापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याची इशारा सुद्धा जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली आहे.