अहेरी : तालुक्यातील मलमपल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक गोपीनाथ गिरमा उरेते यांना काही दिवसा पूर्वी लिवर,किडनीचे आजार असल्याने गोपीनाथ उरेते यांना चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यासाठी रेफर करण्यात आले सोयाम कुटूंबियांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आर्थिक अडचण भासत होती.
“ही”अडचण आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी कडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देताच उरेते कुटुंबातील नातेवाईकांना अहेरी अजयभाऊ यांच्या जनसंपर्क कार्यालय येते बोलावून उरेते कुटुंबातील अडचण जाणून घेऊन.त्यांना आर्थिक मदत करण्यात आली.अजून कोणत्याही मदतीसाठी मला संपर्क करावी म्हणून उरेते कुटुंबातील नातेवाईकांना सांगण्यात आले.त्यावेळी उरेते कुटुंबातील नातेवाईकांनी अजयभाऊंचे आभार मानले.
यावेळी आविसं आजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,रा.का.पा.अहेरीचे तालुका अध्यक्ष डॉ.निसार हकीम,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सोयाम कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.
Home सामाजिक माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उरेते कुटुंबियांना...