Home अहेरी वेंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिरात स्व.रामय्याजी पोचय्या कंकडालवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ- महाप्रसाद वितरण

वेंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिरात स्व.रामय्याजी पोचय्या कंकडालवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ- महाप्रसाद वितरण

2
0

अहेरी : तालुक्यातील व्येंकटापुर येथील महाशिवरात्री यात्रा निमित्त आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी वेंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिरात कुटुंबसह पुजा अर्चना करून बालाजी स्वामीचे दर्शन घेतले.

व्येंकटापुर येथे वेंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिरात महाशिवरात्री निमित्त येणारे भाविकांना स्व.श्री.रामय्याजी पोचय्या कंकडालवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाप्रसादचा आयोजन करण्यात आले.

त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी समस्त जनतेला भाविक भक्ताना महाशिवरात्री यात्रा निमित्याने हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि कंकडालवार परिवार सह भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आले.

त्यावेळी अजय कंकडालवार यांनी ईश्वर चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून मनोभावे प्रार्थना केली.

सोबत महाशिवरात्री पुजना यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,पंचायत समिती माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार,आई मंदाबाई कंकडालवार,वैभवभाऊ कंकडालवार उपसरपंच ग्रामपंचायत इंदाराम,युवराज कंकडालवार,विराज कंकडालवार,ऋतुराज कंकडालवार,सरपंच अक्षय पोरतेट,चिरंजीव चीलेलवर उपसरपंच,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांच्या सह परिसरातील भाविक व स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here