अहेरी : तालुक्यातील किष्ठापूर दौड ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या दोडगीर येथील दोडगीर मंडळ द्वारे भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित केले आहे.या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कांकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सभापती सुरेखा आलम कडून देण्यात येत आहे.तसेच तृतीय पारितोषिक पोलीस स्टेशन देचलीपेठा,ग्रामसेवक ग्रामपंचायत दौड कडून देण्यात आली आहे.
यावेळी सत्यम नीलम,अनिल मूलकरी,सुधार नैताम,वसंत मूलकरी,आनंद जियाला,आनंद मूलकरी,विष्णू मूलकरी,महेश नीलम,नितेश मूलकरी,राजय्या मूलकरी,रामाय्या मूलकरी,सत्यम दगम,श्रीनिवास कामडेसह परिसरातील आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.