Home अहेरी मोदूमतूर्रा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे अनावरण सोहळा...

मोदूमतूर्रा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे अनावरण सोहळा संपन्न

9
0

अहेरी : तालुक्यातील मोदूमतूर्रा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मल्टीपरपज चॅरिटेबल ट्रस्ट,पंचशील बौद्ध समाज मंडळ तथा दि बौद्ध सोसायटी ऑफ इंडिया ग्राम शाखा मोदूमतूर्रा तर्फे तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमांचे अनावरण सोहळा कार्यक्रम दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी बुधवारीला पंचशील चौक मोदूमतूर्रा येथे आयोजित केले आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन पूज्य भदन्त ज्ञानज्योती महाथेरो व त्यांचे संघ आद.राज्यरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते पार पडले.कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमांला धम्मदान देण्यात आली.

त्यावेळी मंडळ कडून स्वागत व सत्कार करण्यात आली आहे.सर्व प्रथम कंकडालवारांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,भगवान बिरसा मुंडा,महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले,लोकमान्य टिळक आदी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आविसं,काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावकरी,मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here