Home मुख्य बातम्या अहेरीसाठी काँग्रेसकडून हनमंतु मडावी यांना उमेदवारीची आश्वासन

अहेरीसाठी काँग्रेसकडून हनमंतु मडावी यांना उमेदवारीची आश्वासन

39
0

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात लवकरच विधानसभेची लढत बघायला मिळणार आहे.यासाठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघातही विधानसभेच्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवार सरसावले आहेत.यात संभाव्य उमेदवार म्हणून ना.धर्मराव बाबा आत्राम व त्यांची कन्या जि.प.माजी अध्यक्ष भाग्यश्री हलगेकर(आत्राम),माजी राज्यमंत्री अंबरिश्रराव आत्राम,माजी आमदार दिपक दादा आत्राम,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हनुमंत मडावी,संदिपभाऊ कोरेत आदी नावांची चर्चा सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेसने लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे..‘आविस’चे अजयभाऊ कंकडालवार यांचा आलापल्ली येथे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम लोकसभा निवडणुक पूर्वी झाला होता.कंकडालवार यांचेसोबत सेवानिवृत्त वन अधिकारी हनमंतू मडावी यांनी सुद्धा आपल्या समर्थकासंमवेत प्रवेश केले होते.या दोन्ही नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षाची ताकद वाढल्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते सांगत आहेत.गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदार संघात अहेरी विधानसभा क्षेत्रातून इंडिया आघाडी व काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान यांना तब्बल बारा हजाराची लीड मिळाली होती.डॉ.किरसान यांना लीड मिळवून देण्यामागे अजयभाऊ कंकडालवार व हनमंतू मडावी या दोघांची पराकाष्टा आहे.यात कोणालाही शंका असू नये.इंडिया आघाडी व काँग्रेसचे उमेदवारांसाठी सकारात्मक वातावरण निर्मितीसह मताधिक्य मिळवून देण्यामागे कंकडालवारांची याक्षेत्रात सुरू असलेल्या निरंतर निःस्वार्थ सामाजिक कार्य मुख्य कारणीभूत ठरली आहेत.

आविसचे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ  कंकडालवार यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील आपल्या हजारो समर्थांकासोबत लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपापेक्षा काँग्रेसचे डॉ नामदेव किरसान यांना महायुतीचे उमेद्वारांपेक्षा अहेरी विधानसभेतून बारा हजारांची अधिक मते मिळाली आहे.काँग्रेस पक्षात प्रवेशापुर्वी आल्लापल्ली येथील हनमंतू मडावी यांना राज्याचे विरोधी पक्षनेते ना.वडेट्टीवार यांनी अहेरी विधानसभेची उमेदवारीची ठोस आश्वासन दिल्याची विश्वासनीय माहिती मिळाली आहे.त्यामुळे आता अहेरी विधानसभा निवडणुकीत अजय कंकडालवार हे कांग्रेस पक्षाची धुरा सांभाळत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसल्याचे त्यांचे दैनंदिन दौरा कार्यक्रमावरून दिसून येत आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला चार महिने बाकी असले तरी आतापासूनच अहेरी विधानसभा निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार ? यावर सर्वत्र चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.पण गडचिरोली- चिमूर लोकसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला सुगीचे दिवस आल्याने यावेळी अहेरीच्या जागेसाठी काँग्रेसकडून ना.विजय वडेट्टीवार व अजय कंकडालवार हे दोन्ही ताकतवर नेते आपली ताकत पणाला लावण्यार असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here