अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील श्रीकृष्ण मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीकृष्ण जन्मष्टमी निमित्त भजनकिर्तनासह गोपाळकाल्याचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,माजी सरपंच अज्जू पठाण,किशोर दुर्गे,प्रशांत गोडसेलवारसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून श्रीकृष्ण भगवानाचे दर्शन घेतले.आलापल्ली शहरासह परिसरातील अनेक गावातील भक्तानीं श्रीकृष्ण मंदिरात दर्शन घेऊन गोपाळकाल्याचे आस्वाद घेतल्या. श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला.