Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी करून दिली मृतदेह स्व:गावी नेण्यासाठी खाजगी वाहनाची...

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी करून दिली मृतदेह स्व:गावी नेण्यासाठी खाजगी वाहनाची व्यवस्था

11
0

सिरोंचा :तालुक्यातील रंगधामपेठा येथील लक्ष्मी चीनन्ना लाटकरी नातीनची त्याबेत खराब असल्याने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी काही दिवसा अगोदर आणले होते नातीन चे उपचार चालू असताना लक्ष्मी चीनन्ना लाटकरी ( वय 65 वर्षे ) हिला अचानक छातीत दुखणे वाढल्याने प्रकृती खूप बिघडल्याने तिचे उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले होते.मृतक लाटकरी यांचे कुटुंब अंत्यत गरीब असल्याने त्यांना मृतकाचे मृतदेह  स्व:गावी घेऊन जाण्यासाठी  आर्थिक अडचण भासत होती.सदर माहिती येथील काँग्रेसचे पदाधिकारी बानय्या जनगम यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना देताच त्यांनी तात्काळ मृतकाचे मृतदेह स्व:गावी रंगधामपेठा येथे नेण्यासाठी कंकडालवारांनी खाजगी चार चाकी वाहन उपलब्ध करून दिले.

यावेळी लाटकरी कुटुंबातील सर्व सदस्यांनी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार मानले.यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, शंकर येलूरकर, कार्तिक तोगम माजी उपसरपंच,तसेच काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित राहून मृतकाचे कुटुंबाला सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here