Home अहेरी इंदाराम येथील भिमन्ना बोनालु यात्रेला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दर्शविली उपस्थिती

इंदाराम येथील भिमन्ना बोनालु यात्रेला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दर्शविली उपस्थिती

27
0

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भिमन्ना बोनालु यात्रा शेकडो भक्तजनांचा उपस्थितीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.या बोनालू यात्रेला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसंमवेत उपस्थिती दर्शवून भगवान भिमन्ना देवाची आशीर्वाद घेतले.त्यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे अशी भगवान भिमन्नाकडे प्रार्थना केली.

यावेळी पुजारी साई पेंदाम,प्रल्हाद पेंदाम,आनंदराव आत्राम,शंकर कोसरे,साई मडावी,सूर्यप्रकाश पेंदाम,शिवराम पेंदाम,जयराम आत्राम,साई मडावी,शंकर वेलदी,भिमा पेंदाम,रोशन सामलवार,रवि वागडे,प्रमोद गोडसेलवार,लक्ष्मण आत्रामसह आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here