अहेरी : तालुक्यातील बीऱ्हाडघाट येथील कटामराज ग्रुप बीऱ्हाडघाट तर्फे भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजित केले आहे.या क्रिकेट स्पर्धेसाठी काँग्रेस समन्वयक अहेरी विधानसभा क्षेत्र व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार कडून प्रथम पारितोषिक देण्यात आली आहे.द्वितीय पारितोषिक आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून तसेच तृतीय पारितोषिक सुंदर नैताम,अनिल मिटकरी,सत्यम नीलम,वसंत मुलकारी,संजयभाऊ कडून देण्यात आली.
क्रिकेट सामन्याची उदघाटन काँग्रेसनेते,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्करभाऊ तलांडे आणि काँग्रेसचे नेत्या,माजी सभापती अहेरी पंचायत समिती सुरेखाताई आलम यांच्या हस्ते करण्यात आली.त्यावेळी गावकरी मान्यवारांना ढोल तशाने जंगी स्वागत केली.
यावेळी डॉ.सुंदर नैताम,सत्यम निलम डॉ.सत्यम दगाम, वाघाळे सर,आनंद जीयाला,सीताराम वेलादी, रामया मुलकरी, हनमंतू सडमेक, माजी सरपंच,अनिल मुलकरी, वसंत मुलकरी नरसिहा वेलादी,आदी मंचावर उपस्थित होते.यावेळी मंडळाचे आयोजक सागर वेलादी,अध्यक्ष शामराव वेलादी, उपाअध्यय सुनील सिडाम, सुनील मडावी, संदिप मडावी, लक्ष्मण वेलादी,व सदस्य गावकरी उपस्तिथ होते. संचालन व आभार प्रदर्शन अर्जुन पोरतेट यांनी केली.