अहेरी: तालुक्यातील कमलापूर गावाचे रहिवासी महेश गोपी मडावी (वय ४५) यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.प्रकृती खालावल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
निधनानंतर मय्यत स्वगावी कमलापूर येथे नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था होत नसल्याने नातेवाईकांची मोठी अडचण निर्माण झाली होती.यावेळी नातेवाईकांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला.माहिती मिळताच अजयभाऊ यांनी क्षणाचाही विलंब न करता मय्यत स्वगावी पोहोचवण्यासाठी तात्काळ वाहनाची व्यवस्था करून दिली.
या तत्पर आणि मानवतावादी मदतीमुळे नातेवाईकांनी काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार मानले असून, कठीण प्रसंगी मिळालेल्या सहकार्यामुळे अंत्यसंस्काराची पुढील प्रक्रिया सुलभ झाली.





