अहेरी : केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचे प्रतीक असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची काल जयंती निमित्त संपूर्ण देशभरात शिवरायांची 395 वी जयंती मोठा उत्सहात साजरा केले आहे.त्यांच्या शौर्याची भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद आहे.महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे विचार पूजले जातात.त्यांचे युद्ध धोरण,मुत्सद्देगिरी,गनिमी कावा शैली आणि प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात.त्यांची ही जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर आनंदाने आणि अभिमानाने साजरा केली.
काल छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अहेरी तालुक्यातील राजपूर पाॅंच येथील शिवराज्य युथ फाउंडेशन राजपूर पाॅंच तर्फे आयोजित शिवजयंती कार्यक्रमाची उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते कारण्यात आली.
त्यावेळी मंडळकडून अजय कंकडालवार यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आली.गावातील गली गल्लीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्प अलंकार करून ‘जय शिवाजी जय भवानी म्हणून जय घोषाणे रैली काढण्यात आली.तसेच मंडळ ठिकाणी भगव्या झेंडाचे ध्वज रोहण कंकडालवार यांच्या हस्ते पार पडले.सर्व प्रथम अजय कंकडालवार शिवाजी महाराज प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून मधुकर वेलदी,संतोष पुरषोत्तमवार,सिनू कापेलवार हे होते.
यावेळी API वडवे साहेब अहेरी,PSI साहेब,रामटेके मॅडम उपसरपंच,स्वप्नील गुडावार,रामूलू कुळमेथे,अनिल गुरनुले,मुरलीधर,अशोक वसेकर,सुरेश आत्राम,वेंकटेश,राजेश दुर्गे,मारुती पुल्लीरवार,भीमराव,गणेश चौधरीसह परिसरातील शिव भक्त तसेच गावातील समस्त नागरिक,स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.