अहेरी : तालुक्यातील मेडपली येथील माजी सरपंच तुकाराम वेलादी यांचे चिरंजीव विद्यमान सरपंच वर – निलेश तुकाराम वेलादी यांचा चिरेपली येथील नामदेव कुमरे यांची कन्या वधू .अस्मिता कुमरे यांच्या विवाह वराचा मंडपात मेडपली येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.
यावेळी माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,लक्ष्मीकांत बोगामी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष भामरागड,विष्णू मडावी उपाध्यक्ष नगरपंचायत भामरागड,प्रमोद आत्राम माजी सरपंच तथा विध्यमान सदस्य पेरमली,दलसु आत्राम उपसरपंच मेडपल्ली,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,आसिप पठाण पत्रकार,श्रीनिवास राऊत,आशिष पाटील ग्रामपंचायत सदस्य नागेपल्ली,किरण नैताम सरपंच पेरमेली,सपनाताई बंडमवार सदस्य पेरमेली,तुळशीराम चंदनखेडे,कवीश्वर चंदनखेडे,प्रभाकर मडावी,चिंनू सडमेक,,पल्लो पाटाळी,प्रमोद गोडसेलवारसह आविस,काँग्रेस पार्टीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.