अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक सत्यनारायण चींचोलकर याचं वृद्धय विकाराच्या झटक्याने आज दुःखद निधन झाले होते..या दुःख निधन वार्ता व्यंकटरावपेठा येथील स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळताच काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी यांनी व्यंकटरावपेठा येथे जाऊन येथील मृत्यूक चींचोलकर परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले.
यावेळी माजी ग्रा.प.उपसरपंच शामराव राऊत, ग्राम पंचायत सदस्य सौ मिनाताई गर्गम,नरेश गर्गम, माधव राऊत, लक्ष्मीनारायण वाघाळे, सत्यनारायण राऊत,माजी ग्रा.प.सदस्य शंकर सिडाम, श्रीनिवास राऊत, हरीबाबा राऊत, योगेश समुद्रालवार, व्यंकटेश राऊत, श्रीनिवास आत्राम, केशव सडमेक, माजी ग्रा.प.सदस्य प्रभाकर कांबळे, श्रीकांत राऊत, महेश दहागावकर,संदिप राऊत,सागर चोधरी, सचिन पांचाऱ्यासह आदी उपस्थित होते.