Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, हनमंतु मडावी यांनी बजावला मतदानाचा हक्क : समस्त...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, हनमंतु मडावी यांनी बजावला मतदानाचा हक्क : समस्त नागरिकांना मतदान करण्याचे केले आवाहन

18
0

अहेरी : दिनांक २० नोव्हेंबर आज मतदानाचा दिवस सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार व त्यांच्या पत्नी माजी पंचायत समिती उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी इंदाराम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आपला मतदान हक्क बजावत मतदान केले.तसेच आज आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे अपक्ष उमेदवार हणमंतु मडावी,त्यांच्या अर्धांगिनी रेखाताई हनमंतु मडावी यांनी सुद्धा मतदान हक्क बजावला.लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी होऊन विधानसभा निवळणुकीत अवश्य मतदान करावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार मतदान करतांना अहेरी विधानसभा क्षेत्रातील मतदारांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here