अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील देचलीपेठा जवळील कम्मासुर येते जय सेवा ग्रुप तर्फे भव्य व्हलिबाॅल स्पर्धेचे आयोजन केले आहे.या स्पर्धेसाठी काँग्रेस समन्वयक अहेरी विधानसभा क्षेत्र व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार कडून प्रथम पारितोषिक देण्यात आली आहे.द्वितीय पारितोषिक आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून तसेच तृतीय पारितोषिक श्री psi पवन बंडे साहेब यांचा कडून देण्यात येत आहे.सदर स्पर्धचे उदघाटन काँग्रेसनेते,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्करभाऊ तलांडे यांच्या हस्ते करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन श्री. डॉ. सुंदर नैताम, प्रमुख पाहुणे श्री. सत्यम निलम माजी उपसरपंच, सौ. वानिता वेलादी ग्राम पंचायत सदस्या जिमलगट्टटा, श्री. रमेश पोरतेट ग्राम पंचायत सदस्य राजाराम, दिपक अर्का, श्री. प्रमोद मुंडे शिक्षक, आनंद जियालासह आदी उपस्थित होते.