Home अहेरी टेकमपल्ली येथे क्रिकेट सामन्याचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण

टेकमपल्ली येथे क्रिकेट सामन्याचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण

1
0

अहेरी : तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या टेकमपल्ली येथे युवा वर्ग स्पोर्टींग क्लब टेकमपल्ली द्वारे भव्य खुले टेनिस ( लाईट ) बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजित केले आहे.

क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचाकडून प्रथम पारितोषिक देण्यात आली आहे.

द्वितीय पारितोषिक मार्कंड ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनीता अतुल कतलाम कडून,तृतीय पारितोषिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा.श्री.हणमंतू मडावी कडून,चतुर्थ पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेकमपल्ली शिक्षकवृंद कडून देण्यात आली.

सदर स्पर्धेचे परिसरातील अनेक संघ भाग घेतले होते.प्रथम पारितोषिक फॉरेस्ट टायगर आलापल्ली द्वितीय पारितोषिक स्व.बालाजी सिडाम इलेव्हन टेकमपल्ली तृतीय पारितोषिक क्रेझी इलेव्हन गडबामणी चतुर्थ पारितोषिक रफ्तार सी.सी अहेरी संघाला मिळाली असून विजेत्या संघाना काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांचा हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

त्यावेळी दीपक नैताम,दिवाकर नैताम,विश्वनाथ आलाम,ज्ञानेश्वर सिडाम,गुणकर नैताम,खुशाल सिडाम,दिवाकर मडावी माजी सरपंच नागेपल्ली,महेश नैताम यांच्या सह परिसरातील क्रीडा प्रेमी व स्थानिक नागरिक तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here