Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचाकडून गर्गम परिवाराला आर्थिक मदत

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचाकडून गर्गम परिवाराला आर्थिक मदत

10
0

अहेरी : समाजाच्या हितासाठी”हा नारा देत आपली वाटचाल करणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे विधानसभा समन्वयक अजय कंकडालवर यांच्या सामाजिक कार्याने प्रभावीत झालेल्या गोरगरीब जनतेकडून आनंद व्यक्त केला जात आहे.आज अहेरी तालुक्यातील महागाव येथील रहिवाशी सत्यम गर्गम यांना सर्पदंश झाला.अतिशय गरीब परिस्थिती त जीवन जगणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना आता कसे होणार अशी भिती वाटली.या घटनेची माहिती कळताच अजय कंकडालवार यांनी आपुलकीने त्यांची विचारणा केली.एवढेच नव्हे तर त्यांना आर्थिक रूपाने मदतीचा हात दिला.काहीही अडचण आली तर मला कळवा.आपण सदैव गोरगरिबांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी प्रशांत गोड्सेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,राजेश दुर्गे ग्रामपंचायत सदस्य,वंदना दुर्गे ग्रामपंचायत सदस्य चंद्राजी रामटेके,पुरुषोत्तम गर्गम,गजानन झाडें,चिन्नना पनेम,देविदास मुंजामकर,प्रवीण दुर्गेसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here