अहेरी : तालुक्यातील वट्रा ( कोत्तागुडम ) येथे रहिवाशी मुतन्नाजी पेंदाम यांचे डिसेंबर 8 तारीखेला दुःखात निधन झाले आहे.आज त्यांचे तेरवी कार्यक्रम आयोजित केले आहे.आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी तेरवी कार्यक्रमला उपस्थित राहून पेंदाम कुटुंबाचे सांत्वन केले.
          यावेळी माजी उपसरपंच अशोक येलमुले,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गे,स्वप्नील मडावीसह काँग्रेस स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
 
            

