अहेरी : तालुक्यातील चौडामल्ली ( पेरमिली ) येथील जय सेवा पेरसापेन क्रीडा मंडळ यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजित केले आहे.या स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली.त्यावेळी मंडळकडून अजय कंकडालवार यांचे सत्कार व स्वागत करण्यात आली आहे.
भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक प्रमोद आत्राम माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत पेरमिली,निलेश वेलादी सरपंच ग्रामपंचायत मेडपल्ली कडून तसेच तृतीय पारितोषिक वेंकटेश तलांडी ग्रामपंचायत सरपंच,दिवाकर झाडे सचिव ग्रामपंचायत अरेंदा यांचे कडून देण्यात येत आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतु मडावी हे होते.
यावेळी कार्यक्रमाला व्येकटेश पेडू तलांडे सरपंच ग्रामपंचायत आरेदा,प्रमोद आत्राम माजी सरपंच पेरमेली,बंडू आत्राम माजी सरपंच,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,वारलु तलांडे,मादी आत्राम,कोलूजी आत्राम,रमेश गावडे,कोत्ताजी आत्राम,वंजा आत्राम,साजन गावडे माजी उपसरपंच पेरमेली प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील क्रीडा प्रेमी तसेच स्थानिक कार्यकर्ते,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.