सिरोंचा : तेलंगनातल्या कालेश्वर येथे सरस्वती पुष्कर मेळा सुरु असून काँग्रेसचे अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी बुधवारला आपल्या लग्न वाढदिवसाचे औचित्य साधून कुटुंब समवेत पुषकर मेळ्यात पुण्य स्नान केले.
कंकडालवार कुटुंबियांनी सरस्वती पुष्कर मेळ्यात पुण्य स्नानानंतर येथील कालेश्वर-मुक्तेश्वर मंदिरात जाऊन भोलेनाथाची दर्शन घेऊन पूजा अर्चना करून गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख समृद्धी लाभावे म्हणून मनोभावे प्रार्थना केली.
यावेळी मातोश्री मंदाबाई कंकडालवार,युवराज कंकडालवार,विराज कंकडालवार,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,सिरोंचा काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष सतीश जावजी,सिरोंचा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मल्लिकार्जुन आकुला,सिरोंचा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच रवी सल्लम,अजयभाऊ सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,प्रमोद गोडसेलवार आदी उपस्थित होते.