अहेरी : काल इंदाराम येथे 1857 च्या इंग्रजाविरुध्द स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेले स्वातंत्र्यवीर,क्रांतीकारक क्रांतिवीर शहिद विर बाबुराव शेडमाके यांच्या शहिद दिना निमित्त औचित्य साधून येथील आदिवासी समाज बांधवांकडून तसेच समस्त गावाकऱ्यांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आली होता.
सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून विर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अजय नैताम,गुलाबराव सोयम पांडुरंग तोरम,उमेश कोरेत,विनोद सडमेक,मल्लेश तलंडी,शयामराव मडावी,लक्ष्मण सिडाम,दिलीप मडावी,संदीप सोयम,संतोष कोडापे,दिलीप मडावी,मुशलीत तलंडी,अर्जुन सोयम,नागार्जुन कोरेत,सदाशिव कोरेत,अनिल तलांडे,कोकशाही कोरेत,दशरत कोरेत,मुकेश कोरेत,श्रीनिवास सिडाम,मुत्ताराम कोरेत,संजय कोरेत,सुशील मडावी,सुगंधा मडावी,निर्मला मडावी, लक्ष्मी तलांडे,मायाताई डबा सह समस्त आदिवासी बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.