Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

12
0

अहेरी : तालुक्यातील तानबोडी येथील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा काँग्रेसचे नेते श्री.अशोककाका येलमुले यांचे तृतीय चिरंजीव वर-विजय उर्फ भास्कर यांची तेलंगणातील कोमरामभिम ( आसिफबाद ) जिल्ह्यातील मोतूकगुडा येथील श्री.मारोती भिमानकर यांचे जेष्ठ कन्या वधू – लावण्या उर्फ भाग्यलक्ष्मी यांच्या विवाह वधूच्या मंडपात मोतूकगुडा येथे विवाह सोहळा संपन्न झाला.

या विवाह सोहळ्याला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेसचे नेत्या,अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनाली अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.

यावेळी आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,माजी जि.प.सदस्य सुनीता कूसनाके,माजी जि.प.सदस्य अजय नैताम, ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे,सदस्य वंदना दुर्गे,ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव सोयाम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,ताशू शेख,श्रीनिवास राऊत,धानोरकर काका,प्रवीण दुर्गे,बाबुराव नागापूर,स्वप्नील मडावी,प्रकाश दुर्गे,नरेश गर्गम,सचिन पंचार्य,प्रमोद गोडसेलवारसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here