Home अहेरी विरोधी पक्षा नेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अहेरी नगरीत जंगी स्वागत : अजय...

विरोधी पक्षा नेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अहेरी नगरीत जंगी स्वागत : अजय कंकडालवार

46
0

अहेरी : येथे काल 22 जून रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा – आदिवासी विध्यार्थी संघटनेच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते.या सत्कार सोहळा कार्यक्रमला काँग्रेस पक्षाचे नेते,माजी कॅबिनेट मंत्री तथा विरोधी पक्षा नेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार व नवनिवार्चित खासदार डॉ.नामदेवराव किरसानसह जिल्ह्यातील आदी मान्यवरांचे उपस्थित राहिले होते.

ना.विजयभाऊ वडेट्टीवार काल जिल्हा दौऱ्यावर आले होते.दौऱ्यात अहेरी येथे ना.वडेट्टीवार व खासदार किरसान यांच्या आगमन होतच गावकरी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरत,फटक्यांचा आतषबाजी करत जंगी स्वागत करत गडचिरोली लोकसभा निवडणुक विजयोत्सव रैली काढण्यात आली आहे.तसेच ना.वडेट्टीवार आणि डॉ.किरासन यांनी विविध विभागाचे आढावा बैठक घेतले होते.

ना.विजयभाऊ वडेट्टीवार आढावा बैठकीत म्हंटले की’अनेक समस्यांनी वेढलेला आणि मूलभूत जन सुविधांचा अभाव असलेल्या अहेरी तालुक्यातील प्रलंबित विकासकामांचा आज आढावा घेतला.

तालुक्यातील रस्त्यांची बकाल अवस्था,महसूल विभागाच्या अटी व शर्तींना न जुमानता होणारे अवैध उत्खनन,वनविभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या ठिकाणी होणारी अवैध कामे अशा अनेक समस्यांनी ग्रस्त मागास अहेरी कडे स्थानिक लोकप्रतिनिधीने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.राज्य सरकार आणि केंद्र सरकार कडून सुद्धा अहेरीकडे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे येथील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी विविध विभागांचा आढावा घेऊन निर्देश दिले.

त्यावेळी गडचिरोली – चिमूर लोकसभा निवडणुकीत डॉ.नामदेवराव किरसान यांनी भाजपाचे उमेदवार नेतेंचा पैकी जवळपास 1लाख 40 हजार मतांनी प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल अहेरी येथील गांधी चौकात ‘येथे विरोधी पक्षानेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार आणि नवनिवार्चित खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित केले.आविसं,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवारसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हस्ते ना.वडेट्टीवार नवनिवार्चित खासदार डॉ.किरसान यांच्या सत्कार करण्यात आली.

सत्कार सोहळावेळी गडचिरोली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय हा कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाने झाला आहे.या निवडणुकीत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ते हा स्वतःची निवडणूक म्हणून लढला आणि जिंकला अशी वडेट्टीवार म्हणले आहे.

या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्ते तसेच स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here