अहेरी : काँग्रेस अहेरी विधानसभा मतदारसंघचे समन्वयक व माजी जि. प.अध्यक्ष अजय ( Ajjubhau ) कंकडालवार यांनी राजकारण, समाजकारण,सोशल मीडियासह विविध कामात ठिकाणी ऍक्टिव्ह असतात.
जिल्ह्यात खासदार व आमदार सत्ताधारी आहेत.यापैकी काहीजण केंद्रात व राज्यात सत्तेत आहेत.तरीही अज्जूभाऊ कंकडालवार यासर्व नेत्यान मध्ये नेहमीच उजव्या ठरताना दिसतात.आमदार किंवा खासदार पक्ष संघटनेतील कोणतेही मोठे पद नसूनही कार्यकर्ते आणि सामान्य माणसांच्या विश्वास अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वावर वाढत असल्याचे दिसत आहे.
त्यामुळेच दिवसेंदिवस त्यांच्या घराबाहेर कार्यकर्ते आणि सामान्य जणांची मोठी रांग पाहायला मिळत आहे.अज्जूभाऊ यांच्याकडे कोणतेही आमदार व खासदार पद नसले तरी कार्यकर्ते आणि सामान्य लोकांच्या कामासाठी त्या संबंधित यंत्रणेशी संवाद साधतात.पत्रव्यवहार करतात आणि आपल्याकडे आलेल्या व्यक्तीचे काम करुन देतात.त्यामुळेच त्यांच्याकडे गर्दीचा ओघ वाढत चालला आहे.