सिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वडदेली येथील ज्येष्ठ नागरिक कारे सिंगा मडे ( वय 61 वर्षे ) पहाटे हे आपल्या राहते घरी अचानक खाली पडले होते.यात तो गंभीर जख्मी झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आली होती.
मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार दरम्यान त्यांना मूत्यू घोषित केले. मृतक मडे परिवार अंत्यत गरीब असून त्यांना शव स्वगावी वडदेली येथे नेण्यासाठी आर्थिक अडचण बसत होती.त्यावेळी त्यांचा मुलगा शंकर मडे यांनी झिंगानूर ग्रामपंचायतचे सरपंच कारे मडावी यांना संपर्क करून त्यांच्या आर्थिक अडचणी सांगितले.
यावेळी सरपंच कारे मडावी यांनी लगेच माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून मृतकाची आर्थिक परिस्थिती सांगून त्यांना मृतदेह स्वगावी आणण्यासाठी मदतीबद्दल सांगितले असता मृतकाचे परिस्थितीची गांभीर्य समजून घेत काँग्रेस नेते कंकडालवार यांनी विलंब न करता गडचिरोली येथील काँग्रेसचे कार्यकर्ते शिवराम पुल्लूरी यांना सांगून तातडीने वाहन उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
त्यांच्या तत्पर पुढाकारामुळे काही क्षणांतच वाहनाची व्यवस्था करण्यात आली आणि मृतदेह गडचिरोलीहुन मूळगावी वडदेली येथे हलविण्यात आला.
स्थानिकांनी या संवेदनशील प्रसंगी कंकडालवार यांनी दाखवलेल्या तत्पर मदतीबद्दल त्यांचे व त्यांच्या टीमचे आभार मानत समाधान व्यक्त केले.तसेच यावेळी काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी त्यांच्याकडून मृतदेह पोस्टमॉर्टेम साठी लागणाऱ्या साहित्यासाठी सुद्धा आर्थिक मदत करवून दिले.





