गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलन मंडपाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील तसेच राज्यातील संपूर्ण जिल्हा परिषद लिपिक संवर्गाने आपल्या न्याय्य व दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांसाठी निर्णायक लढ्याची घोषणा केली आहे.
मुख्यालयासह गडचिरोली जिल्ह्यातील सर्व १२ पंचायत समित्यांतील लिपिक कर्मचाऱ्यांनी दि.१६ फेब्रुवारी २०२६ पासून असहकार व कामबंद आंदोलन सुरू केले असून,शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्याने दि.२३ फेब्रुवारीपासून गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालय समोर बेमुदत व कामबंद आंदोलन छेडण्यात आली आहे.
लिपिक संवर्ग हा प्रशासनाचा कणा असूनही त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले,असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.आमच्या खांद्यावर प्रशासन चालते मात्र आमच्याच हक्कांबाबत शासन उदासीन का?असा सवाल कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना जिल्हा शाखा – मुख्यालय जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन राबविण्यात येत आहे.
आंदोलनकर्त्यांच्या मते चौथ्या वेतन आयोगापासून प्रलंबित वेतनत्रुटी दूर करून सुधारीत वेतनश्रेणी लागू करणे, सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे,१ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ देणे तसेच मृद व जलसंधारण विभागात होणारे अधिकारी- कर्मचाऱ्यांचे समावेशन रोखणे या मागण्या रास्त व न्याय्य आहेत.
संघटनेने स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे
ही लढाई कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून,आमच्या हक्कांसाठी आहे.न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील.आंदोलनामुळे काही प्रशासकीय कामांवर परिणाम होत असला तरी,यासाठी शासनाच्या दुर्लक्षालाच जबाबदार धरले जात आहे.शासनाने वेळेत संवाद साधला असता,तर आंदोलनाची वेळ आली नसती,अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविली आहे.
Home गडचिरोली काँग्रेस नेते कंकडालवार यांची कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलन मंडपाला भेट व जाहीर पाठिंबा…जय...


