अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात प्रजाकसत्ताक दिनचे औचित्य साधून कस्तुरबा बालिका विद्यालय इंदाराम,भगवंतराव हायस्कूल इंदाराम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदारामचे वतीने संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या संस्कृती कार्यक्रमचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ.वर्षाताई पेंदाम ग्रामपंचायत सरपंच इंदाराम होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षण अधिकारी टीचकुले साहेब,सौ.सोनालीताई कंकडालवार, वैभवभाऊ कंकडालवार ग्रामपंचायत उपसरपंच इंदाराम,गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य इंदाराम,तेलंगे ताई,भगवंतराव हायस्कूल इंदारामचे मुख्याध्यापक मामिडलावार सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक पत्तीवार सर, नगरे सर,बुरके सर,मनकर सर,ढवास मॅडम,करुणा मोहरे मॅडम पि.एस.आय पोलीस स्टेशन अहेरी,करिश्मा मोहरे मॅडम पि एस आय पोलीस स्टेशन अहेरी,पुलरवार सर,श्रीनिवास कोत्तावडालवार,निलेश दुर्गे,वसंत मेश्राम,अरूण मज्जेलवार, सूर्यप्रकाश पेंदाम,प्रमोद गोडसेलवार लक्ष्मण आत्रामसह विद्यार्थी व पालक तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
त्यावेळी सन 2024-2025 मध्ये महाराष्ट्र शासनामध्ये उपक्रम आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत केंद्रावर मूल्यांकन झाला व तालुक्यावर मूल्यांकन झाला जिल्ह्यावार झाला.विभाग स्तरावर राजस्तरावर झाला.या स्पर्धामध्ये मागीलवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदाराम या शाळेला चौथ क्रमांक मिळाला आहे या शाळेला पारिकतोषिक सुद्धा मिळाला आहे.याप्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी पत्तिवार सर यांचे पु्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
अजय कंकडालवार यांनी उदघाटन दरम्यान चिमुकल्या मुलांना मार्गदर्शन करतांना म्हटले सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे शास्त्रीय आणि लोककलेच्या माध्यमातून विविध संप्रदाय,परंपरा,कला आणि रीतिरिवाजांचे प्रदर्शन.या कार्यक्रमांत नृत्य, गाणे, नाटक,कविता,चित्रकला,शिल्पकला इत्यादी कलांचा समावेश असतो. सांस्कृतिक कार्यक्रमांचा उद्देश केवळ मनोरंजन करणे नसून,ते लोकांना एकत्र आणणे, सांस्कृतिक समृद्धी वाढवणे आणि परंपरेचे जतन करणे हे देखील असतात.सांस्कृतिक कार्यक्रम विविध प्रकारे आयोजित केले जातात असे मत व्यक्त केले.नृत्य सादर केलेले विद्यार्थ्यांना पारिकतोषिक सुद्धा कंकडालवार यांचाकडून देण्यात आला आहे.