Home आलापल्ली ग्रामसभा अध्यक्ष सडमेक यांनी दिले जिल्हा अध्यक्ष मडावी यांना शुभेच्छा!

ग्रामसभा अध्यक्ष सडमेक यांनी दिले जिल्हा अध्यक्ष मडावी यांना शुभेच्छा!

35
0

आलापल्ली : मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक हनमंतू मडावी यांनी आविसंचे नेते,माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व स्वीकारत समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.काँग्रेस प्रवेशानंतर अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी विधानसभा समन्वयक म्हणून, तर हनमंतू मडावी यांची आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

त्यानिमित्त आज आलापल्ली ग्रामसभा अध्यक्ष किशोरभाऊ सडमेक,प्रकाश कोरेत,साईनाथ उरेत,चंदूभाऊ बेझालवार,अज्जूभाऊ पठाणसह ग्रामसभा सदस्यांनी सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी साहेबांची आलापल्ली येथील निवास्थानी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिले.तसेच येणाऱ्या निवडणुकीबाबत व येथील समस्या बाबत चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here